+919637585815/+919096031488 gpwatangi1957@gmail.com
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • गॅलरी
  • विभाग
    • पाणी,आरोग्य व स्वछता
    • शिक्षण
    • नागरी सेवा
    • रस्ते आणि सुशोभीकरण
    • घनकचरा व्यवस्थापन
    • महसूल
  • वित्त आयोग
    • वित्त आयोग 2020-21
    • वित्त आयोग 2021-22
    • वित्त आयोग 2022-23
    • वित्त आयोग 2023-24
  • मीडिया कॉर्नर
    • पर्यटन स्थळे
    • नवीन खबर
  • नोटीस
  • जमा खर्च
    • जमा खर्च 2019-20
    • जमा खर्च 2020-21
    • जमा खर्च 2021-22
    • जमा खर्च 2022-23
  • पुरस्कार
    • पुरस्कार 1
    • पुरस्कार 2
    • पुरस्कार 3
    • सन्मान चिन्ह
    • नवीन पुरस्कार,सन्मान चिन्ह 1
    • नवीन पुरस्कार,सन्मान चिन्ह 2
  • विकास कामे
  • संपर्क

आमच्याबद्दल



वांटगी गांवा संबधी थोडस

    महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्हात आजरा तालुक्यातील तार ओहळेच्या काठावर वसलेले निसर्ग रम्य परिसरातील वांटगी गांव "तार ओहळेच्या काठावर वसल गाव चिमुकले माझे,देव रवळनाथांच्या आशिर्वादाने नाव वांटगी साझे".कोल्हापूर जिल्हातील आजरा तालुक्यातील वांटगी गावात शासनांच्या विविध योजना राबविणारे श्री.रवळनाथ देवाच्या आशिर्वादाने पावन झालेले तसेच अध्यात्मिक जगत गुरु यांच्या पद स्पर्शानीं पावन झालेले एक विशीष्टपूर्ण गावं.या गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात.या गावाला डोंगराळ भाग म्हणून हि संबोधले जाते.सह्याद्रीच्या कुशीत म्हणजेच डोंगराळ भागात वांटगी हे गाव वसलेले आहे.शेती हा ह्या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.तांदूळ,ऊस,नाचना,भुईमुग,व काही प्रमाणात भाजीपाला ही पिके घेतली जातात.या ग्रामीण भागात पावसावंरच पिके अवलंबून असतात.इतर देशात मोठ्या प्रमाणात मागणी असलेला घनसाळ तांदळाचे पिक घेतले जाते.आज पर्यंत वांटगी या गावाला महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे.तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा देखील पुरस्कार मिळाला आहे.निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे.पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजने मध्ये तिसऱ्या वर्षामध्ये प्राप्त होणेकारिता सहभागी आहे.या गावचे जागृत देवस्थान म्हटले तर गावची पांढर म्हणजेच श्री.रवळनाथ.या रवळनाथाचा वर्षातून एकदा महोत्सव करून महाप्रसाद केला जातो.त्या निमित्याने गावात दोन-तीन दिवस निरनिराळे कार्यक्रम राबवले जातात.गावात इतर देवालये आहेत. त्यात समावेश असणारी महादेव मंदिर,विठ्ठल मंदिर,लक्ष्मीचे मंदिर,रवळनाथ मंदिर,दत्त मंदिर,हनुमान मंदिर,गणपती मंदिर,नागोबा देवालय तसेच ख्रिचन समाजाचे चर्च इतर अनेक देवालाये आहेत.तसेच त्यास या गावचे खास वैशिट्य म्हणजे बहुसंख्येने ख्रिचन समाज या गावामध्ये आहे.गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावाने व शांततेने एकजुटीने सर्व उत्सव साजरे करतात.

"एका छताखाली जमुनी सारे सन उत्सव करती साजरे असे आमचे सर्वाहुनी'गाव वांटगी न्हारे."गावातील तरुण मंडळामार्फत गणेश उत्सव,नवरात्र उत्सव, शिवजयंती,दत्त जयंती,महाशिवरात्री इत्यादी अनेक उत्सव साजरे केले जातात.त्याच बरोबर दसऱ्याला पालखी सोहळा साजरा केला जातो. "आठवण येते दसऱ्याची,खांद्यावरून पालखी मिरवण्याची.तुतारीच्या आवाजाची,पालखी नाचवण्याची." तसेच नवरात्र उत्सव,गणेश उत्सव ला अनेक सांस्कृतीक कार्यक्रम साजरे केले जातात.त्या मध्ये रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,झिम्मा – फुगडी,बैलगाडी,क्रिकेट स्पर्धा,गायन स्पर्धा घुठ्ठा स्पर्धा इत्यादी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तसेच मनोरंजन कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते.गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून मोठ्या भक्ती-भावाने आनंदाने विठ्ठल रुक्माई सभा मंडपात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो "‘एक गांव – एक गणपती" या सारखे अनेक उपक्रम राबविले जातात.तसेच ख्रिचन समाजाचा मोठ्या प्रमाणात म्हणजेच संपूर्ण महाराष्टात साजरा केला जाणारा ख्रिसमस पेस्ट देखील साजरे केले जाते.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते.या गावामध्ये वारकरी सांप्रदायातील लोक देखील वर्षातून एकदा मंजेच मार्च महिन्यामध्ये पारायण सोहळाचे आयोजन केले जाते.सात दिवस ज्ञःनेश्वरी वाचन,प्रवचन कीर्तन करून शेवटच्या दिवशी दिपोस्तव कालाकीर्तन नंतर पालखी मिरवणूक करून महाप्रसाद करून या कार्यक्रमाची सांगता केली जाते.गावामध्ये हा देखील कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व उत्सवाने साजरा केला जातो.तसेच वर्षातून एकदा कार्तिक महिन्यामध्ये पंढरपूरला जातात.जाऊन आल्यानंतर पण विठ्ठल मंदिर येथे त्याचा कार्यक्रम राबविला जातो.तसेच दत्त जयति पण मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.त्याच प्रमाणे अनेक कार्यक्रम राबविले जातात.आणी म्हणूनच म्हणतात,"पंरपंरेचे आहे आम्हास भान त्यांचेच घेऊन संस्कार आम्ही राखतो त्याचीच शान." तसेच गावामध्ये ग्राम सूरक्षा दलाची नियुक्ती करून त्यातील सदस्यांना रात्रीच्या वेळी प्रत्येक दिवशी गस्त घालनेकारिता सूरक्षा दलातील पाच सदस्याची नेमणूक केली जाते.गावामध्ये अंधश्रद्धा व हुंडाबळी या विषयी अनेक कार्यक्रम साजरे करून जनजागृती केली जाते."कार्यक्रमा बरोबर आम्ही केली गस्ती,म्हणूनच आहे.सामाजिक सुर्क्षीततेची वस्ती."गावातील बहुतांश भागामध्ये वनीकरण केलेले आहे.त्यामध्ये निलगीर काजू सागवान या रोपाची लागवड केलेली आहे.पर्यावरणाचा विचार करता गावाकडून शक्य तितक्या प्रमाणात वुक्ष लागवड केली जाते.‘शाळेच्या आवारामध्ये प्रत्येक विद्यार्थी कडून रोपांची लावण व जोपासना करून घेतली जाते.गावामध्ये म्हैस,गाय,शेळ्या,कोंबड्या,बैल इत्यादी मोठ्या प्रमाणात पाळले जातात.गाव डोंगराळ भागात असल्याने जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात.शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते.गावातील छोटे – मोठे उद्योग देखील केले जातात.त्यापैकी सुतार काम,गवंडी काम,सेंट्रिंग,टेलर काम,विटा तयार करणे,असे अनेक व्यवसाय करतात.तसेच गावामध्ये शोभिबंत अश्या मातीच्या मुर्त्या बनवण्यास येथील लोक कुशल आहेत.व त्यांच्या मूर्त्यांना बाहेरून गावातून पण मागणी केली जाते.त्याच बरोबर महिलांना बचत गटामार्फत रोजगाराची उपलब्धता झाली आहे.अश्या हा आमचा वांटगी गाव आधुनिकतेच्या जगात विकासाची कास धरून चालत असलेला गाव.

"असा हा आम्ह्चा वांटगी गाव न्हारा" "माझ्या गावची वाट,रम्य तो नागमोडी घाट खळखळ करती सह्याद्रीचे झरे,सुंदर माझे गाव गोजिर गावची माझ्या रीतच न्यारी,आनंदे नांदती भावंडे सार होती सामील एकमेकांच्या सु:ख-दु:खात,अपार प्रेम यांच्या उदरात घडवी एक माणूस आम्हा, अशी माझी गावची शाळा आनंदात बागडती लहान मुले,उमलवते ही उद्याची फुल आदर्श अशी ही माझी शाळा,पाझर फोडी हिते ज्ञानाची शिळा स्वावलंबी शिक्षण हेच एक ध्येय,विद्येचे हे मंदिर असे सर्वां प्रिय हिरवी गार गर्द वनराई,शोभे घनदाट वेळू,पायर,नान्याची देवराई.मध्ये देऊळ रवळनाथ,संगे महादेव,विठ्ठलाईची साथ पाहता तयाचे मंदिर.. धन्य वाटे सारा परिसर जोडूनी दोन्ही कर,टेकीतो माथा तयाच्या चरणावर गावची संस्कुती आणि एकजूट, जपणे हेच आम्हा ठाव. दुर्गुण आणि दुर्जनांना नाही येथे वाव म्हणुनी आहे.. माझ्या गावाचे पंचक्रोशीत मोठे नाव जाईन तिकडे अभिमानाने, मिरवतोय मी माझ्या गावाचे नाव"

वांटगी.....

Contact Us

A/P Watangi, Tal-Ajara ,
Dist-Kolhapur, Pincode-416504

Copyright © All rights reserved