वाटंगी साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही गावापासून २ कि मी अंतरावरील पाझर तलावातून केलेली आहे. सायपन पद्धतीने तलावातील पाणी विहिरीत आणून ते टाकीमध्ये सोडले जाते व तेथून नळाद्वारे प्रत्येक कुटुंबाला पुरेशे पाणी दिले जाते.पिण्याच्या पाण्याचे नमुने सातत्याने पिण्यास योग्य असलेबाबत तपासणी करून घेतले जातात. मोरेवाडी व धनगरवाडा येथे सायपन पद्धतीने नैसर्गिक पाण्याच्या स्त्रॊतापासून पाणी उपलब्ध केले आहे.पाणी पुरवण्यासाठी पुरेसे कर्मचारी नेमले आहेत. मोरेवाडी धनगरवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी २ कोटी २१ लाखांचा पाक्षर तलाव दिवाळीला सुरू होत आहे.
.
स्वच्छता व आरोग्य
वैयक्तिक स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. आरोग्याच्या बाबतीत नागरिक दक्ष असुन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांची काळजी घेतली जाते. लसीकरण प्रभावीपणे राबविले जाते. किशोरवयीन मुलींकरीता सॅनिटरी नॅपकिन व डिस्पोजर मशीनची व्यवस्था केली आहे. संपुर्ण गावांमध्ये जंतुनाशक फवारणी केली आहे.