+919637585815/+919096031488 gpwatangi1957@gmail.com
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • गॅलरी
  • विभाग
    • पाणी,आरोग्य व स्वछता
    • शिक्षण
    • नागरी सेवा
    • रस्ते आणि सुशोभीकरण
    • घनकचरा व्यवस्थापन
    • महसूल
  • वित्त आयोग
    • वित्त आयोग 2020-21
    • वित्त आयोग 2021-22
    • वित्त आयोग 2022-23
  • मीडिया कॉर्नर
    • पर्यटन स्थळे
    • नवीन खबर
  • नोटीस
  • जमा खर्च
    • जमा खर्च 2019-20
    • जमा खर्च 2020-21
    • जमा खर्च 2021-22
  • पुरस्कार
    • पुरस्कार
    • सन्मान चिन्ह
    • नवीन पुरस्कार,सन्मान चिन्ह 1
    • नवीन पुरस्कार,सन्मान चिन्ह 2
  • विकास कामे
  • संपर्क

नागरी सेवा



   ग्रामपंचायतीकडुन नागरिकांसाठी पुढील सेवा प्रदान करण्यात येतात
     1 ) घरटान उतारा
    2 ) जन्म मृत्यू नोंद दाखला
    3 ) विवाह नोंद दाखला
    4 ) जन्म - मृत्यू नोंद नसलेबाबतचा दाखला.
    1) ज्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय , महात्मा गांधी तंटामुक्त व्याय भवन तलाठी कार्यालय , कृषी कार्यालय , आशा कार्यालय , पोष्ट ऑफीस , अंगणवाडीसह सर्व कार्यालये समाविष्ट आहेत . आजरा तालुक्यामध्ये जी काही मोजकी मोठी गावे आहेत त्यातील पहिल्या 5-7 गावामध्ये वाटगीचा समावेश आहे . तार ओहोळ व गावओहोळ च्या काठी असून वाटंगी , मोरेवाडी , धनगरवाडा अशी युपग्रामपंचायत आहे . शेती , पशुपालन व दुग्धव्यवसाय , कुक्कुटपालन इ.प्रमूख व्यवसाय असून विधंन विहिरी व ओढयाच्या पाण्यावर येथील कष्टाळू शेतकरी , प्रंचड कष्टाने व पांरपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देवून शेती पिकवतो . दुग्धव्यवसायातुन महिना 12 ते 15 लाखाचे उत्पन्न शेतक - यांना मिळते . शिक्षक , प्राध्यापक , इंजिनिअर , वकिल , डॉक्टर्स , न्यायाधीश , पोलीस , नर्सिग , इंडीयन आर्मी , एअरफोर्स , सी.ए , कृषी अधीकारी , सी.बी.आय अशा अनेक क्षेत्रामध्ये फार्मा , मार्केटींग अंगणवाडी सेविका , मदतनिस , आशा वर्कस अशा अनेक क्षेत्रामध्ये येथील नागरीक कार्यरत आहे . काही युवक - युवती उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःच्या उद्योगात आपले स्थान भक्कम करून आहेत .
     2 ) गावातील श्री.सन्मित्र पतसंस्था , श्री.पंढरीनाथ पतसंस्था व शिवराज पतसंस्थाच्या माध्यमातून गावातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसाईक शिक्षण घेण्यासाठी , घरबांधणी , शेती सुधारणा व अन्य कारणांसाठी वित्तपुरवठा होत असतो . सेवा संस्थांच्या माध्यमातुन कृषी कर्जाची व्यवस्था केली जाते .
     3 ) गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गावचे भूषण आहे . प्रचंड सुसज्ज इमारत , अत्यंत तत्पर सेवा , डॉ सुरज पाटणे यांची सेवाभावी वृत्ती व अत्यत तत्पर स्टाफ यामुळे आजरा तालुक्यासह चंदगड व गडहिंग्लज मधील आसपासच्या गावातील रुग्णांना सेवा मिळते . पशुवैद्यकिय दवाखान्यामुळे पशुधनाचे आरोग्य ही उत्तम राहते . वाद्य पंरपंरा , सोंगी भजन , अखंड हरीनाम सप्ताह व पारायण सोहळा , संगीत भजन अशा सांस्कृतिक वैविध्याने नटलेले वाटंगी हे गांव तालुक्यामध्ये आपले आगळेपण जपून आहे . नाट्यपरंपरा हे या गावचे वैशिष्ट्य आहे .
     4 ) वाटंगी या गावामध्ये चार अंगणवाडी , प्राथमिक शाळा , वाटंगी हायस्कूल वाटंगी , रोझरी इंग्लीश स्कूल वाटंगी , येथे तर 2 अंगणवाडी व 2 प्राथमिक शाळा मोरेवाडी व धनगरवाडा येथे आहेत . हिंदू , खिश्चन , बौद्ध धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात . मंदिरे , चर्च , समाजमंदिर , दोन स्वागत कमानीनी गावची शोभा वाढवली असून , विविध जाती धर्माचे लोक एकमेकांचे सण समारंभ , उत्सव भक्तिीभावाने साजरे करतात . विविधेतेतून एकता जोपासणा - या आपल्या भारतमातेचे वाटंगी हे एक छोटे रूपच होय , धर्माचे लोक एकमेकांचे सण समारंभ , उत्सव भक्तिभावाने साजरा करतात . एकंदरीत देशातील विविधतेतुन एकता जोपासणा - या आपल्या भारतमातेचे वाटंगी हे एक छोटे रूपच होय

.

Contact Us

A/P Watangi, Tal-Ajara ,
Dist-Kolhapur, Pincode-416504

Copyright © All rights reserved