दि. 8/1/2022 रोजी वाटंगी ग्राम पंचायतीला मा.मंत्री हसन मुश्रीफ साहेब यानी सदिच्छा भेट दिली.ग्राम पंचायतीने राबविलेल्या उपक्रमांचे कौतूक केले आणि 25
लाखांचा भरघोस निधी दिला. या वेळी मा. आ. राजेश पाटील,श्री मुकुंदराव देसाई,जिल्हा बँकेचे नूतन संचालक श्री सुधीर देसाई , श्री विष्णूपंत केसरकर, सरपच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व मान्यवर उपस्थित होते.
मा.मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार!!
.
वाटंगी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा!!
स्व.श्री.राजारामबापू देसाई फौडेंशन आजरा कडून "ग्रामपंचायत वाटंगी " तालुक्यातील सर्वोत्कृष्ट आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार माजी ग्रामविकास मंत्री मा,श्री .. मुश्रीफ साहेब यांचे शुभ हस्ते स्वीकारताना आमची ग्रामपंचायतीची टिमे.
.
वाटंगी ग्रामपंचायतिला मिळालेला आदर्श गाव, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार जिल्हा परिषद कोल्हापूर येथे जि. प. अध्यक्ष,उपाध्यक्ष व सिईओ यांचे शुभहस्ते स्वीकारताना.
.
वाटंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीतिल विद्युत पोलवरील नादुरुस्त बल्बची माहीती सहज व सोप्या पध्दतीने नागरिकानी ग्रामपंचायतीला कळविणेसाठी तसेच ग्रामपंचायत , शाळा व अंगणवाडीची माहिती सहज सोप्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला शाळा , अंगणवाडी, वाचनालय,ग्रामपंचायत बंद असताना माहिती उपलब्ध करून देणेसाठी तसेच वाचनालय मधील पुस्तकाची माहीती इ. सर्व माहिती एकाच क्लिक वर म्हणजे QR CODE च्या सह्यायाने मिळणारी अशी संकल्पना राबविणारी ग्रामपंचायत वाटंगी ता आजरा जि. कोल्हापूर ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत.
| माझा गाव माझा अभियान |
.
महाराजस्व योजना अभियान, शासन आपल्या दारी
या कार्यक्रमा अंतर्गत 26/5/2022 रोजी वाटंगी, तालुका आजरा येथे शासन आपल्या दारी ही संकल्पना वाटंगी येथे राबविण्यात आली.. यावेळी जवळपास शासनाच्या 18 खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यासोबत गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या आपल्या घरातील उपलब्ध कडधान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल तसेच बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी शासनाच्या सर्व खात्याच्या योजना व दाखले सर्वसामान्य लोकांसाठी जाग्यावरच उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी आमदार मा.श्री. राजेश पाटील , संजय गांधी योजना अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा व सर्व अधिकारी तसेच सरपंच उपसरपंच , सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ वाटंगी उपस्थित होते्थ.
.
दि. 07/10/2022 रोजी आजरा पंचायत समिती चे मा.गटविकास अधिकारी श्री पाटील साहेब यांची ग्रामपंचायत वाटंगी ला सदिच्छा भेट. तसेच ग्रामपंचायत वाटंगी ला विद्या मंदिर सरंबळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट. मा.गट विकास अधिकारी श्री पाटील साहेब, ग्रा.पं चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी मोजक्याच शब्दात ( Short but sweet ) असे स्थानिक स्वराज्य संस्था या विषायावर चर्चा सञ . मुलीना सनिटरी पॕड व त्याची विल्हेवाट डिस्पोज मशिनद्वारे कशी लावायची याचे मार्गदर्शन, तसेच विद्यार्थी सह शिक्षकांनी हिरकणी कक्ष, व्यायशाळा, वाचनालय, विद्या मंदिर वाटंगी, गावातील मंदिर यांना भेट दिली. उपस्थित सरपंच , उपसरपंच, सर्व सदस्य , ग्रामसेवक, संगणक परिचालिका, कर्मचारी , ग्रामस्थ.
.
ग्रामपंचायत वाटंगी, शाळा, अगंणवाडी, वाचनालय, व्यायाम शाळा, आस्मितागृह इ. ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर माननीय गाडे साहेब (IAS), तसेच तहसीलदार अहिर साहेब, बिडिओ दाइंगडे साहेब यांची सदिच्छा भेट...... तसेच पेपरलेस ग्रा.पं., ग्रामपंचायत दप्तर अ,ब,क वर्गीकरण केलेली एकमेव ग्रा.पं, ISO मानांकन प्राप्त ग्रा.पं, अगंणवाडी, स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने विविध योजनाची माहिती तसेच ग्रामपंचायत इमारत , शाळा रेन वॉटर हार्वेस्टिंग, अंगणवाडी, वाचनालय, घरफाळा, शाळा, क्यू आर कोड याबाबत समाधान व्यक्त केले.
.
घरचा उदरनिर्वाह चालवणेसाठी वाटंगी येथे येऊन चांभार काम करणारी महिला / रणरागिणी.
.
कोरोना सर्हेक्षण
गावामध्ये कोरोना सर्वे करताना ग्रापंचायत मेंबर आणि अधिकारी.सर्वांचे घरोघरी जाऊन चेकिंग आणि नोध करून घेतली.