वाटंगी येथील जवळपास 80 % रस्ते डांबरीकरण झाले असून उर्वरित रस्ते येत्या मार्च पुर्वी डांबरीकरण पुर्ण होणार आहे . मोरेवाडी व धनगरवाडयावरील 100 % रस्ते डांबरीकरण पूर्ण झाले आहे .
.
सार्वजनिक बांधकाम विभागकडील रस्ते
आजरा - वाटंगी , वाटंगी अडकुर - चंदगड व वाटंगी नेसरी हे सार्वजनिक विभागाच्या अखत्यारितील रस्ते आहेत . हे सर्वच रस्ते डांबरी असून वाहतुकीसाठी योग्य आहेत . वाटंगी मोरेवाडी व मोरेवाडी ते आजरा हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधुन डांबरीकरण , पूल , मोरी व गटर्स असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून सदरचा रस्ता दिवाळी नंतर सुरू होण्याच्या मार्गावर आहे .
.
सार्वजनिक रस्त्यांच्या शुशोभिकरण
सार्वजनिक रस्त्यांच्या शुशोभिकरणासाठी रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी खड्डे मारले असून जून महिन्यामध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे . यासाठी अशाक , पाम , कडुनिंब , करंजा , वड , गुलमोहर या झाडांची लागवड केली जाणार आहे .
.
सार्वजनिक ठिकाणांचे शुशोभिकरण
गावातील सर्वच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केलेली असून तेथे जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे व शेजारी फुलांच्या कुंडया ठेवून त्यामध्ये फुलझाडे जुनमध्ये लावणार आहोत . स्मशान शेडच्या शेजारी बाकडी व फुलझांडाची लागवड जून / जुलै मध्ये केली जाणार आहे .ग्रामपंचायत वाटंगीकडून पूर्वीच्या काळात जश्या पिंपळाच्या पारावर बसून ज्या गप्पागोष्टी व्हायच्या, त्याच गोष्टी पुन्हा ह्या बेंच वर बसून होतील. व गावातील ज्येष्ठ मंडळींना बसण्यासाठी प्रमुख ठिकाणी सिमेंट बाकडी